Share

आयपीएल लिलावाआधीच ‘या’ टीमनं बदललं नाव!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) साठी खेळाडूंचा लिलाव हा गुरुवारी चेन्नईत होणार आहे. या लिलावात कोणती टीम कोणते खेळाडू खरेदी करणार याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. सर्वच टीम नव्या दमानं नव्या सीझनमध्ये खेळण्यासाठी या लिलावात खास योजना तयार करुन उतरणार आहेत.

या वर्षी होणाऱ्या सिझनपूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) च्या टीमनं आपलं नाव बदललं आहे. या सिझनपासून या टीमचं नाव पंजाब किंग्स (Punjab Kings) असेल. पहिल्या सीझनपासून खेळत असूनही एकदाही आयपीएल न जिंकणाऱ्या तीन टीममध्ये प्रिती झिंटाच्या या टीमचा समावेश आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बऱ्याच काळापासून या टीमचं नाव बदलण्यावर विचार सुरू होता. बुधवारी एका कार्यक्रमात नव्या नावाची आणि नव्या लोगोची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!