मुंबई : देशभरात सद्या आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. अशातच, पदोन्नतीसाठी देखील आरक्षण लागू करण्यात यावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. दरम्यान, आता या मुद्द्यामुळे महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील धुसफूस समोर आली आहे.
दलित-मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत काहीच निर्णय घेतला जात नाही. मंत्रालयातील काही झारीतील शुक्राचार्य पुणाच्या तरी दबावाखाली येऊन ही अडवणूक करत आहेत. त्यामुळे पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा. मीही या मोर्चात सहभागी होईन, असे आवाहन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेसच्या अनुसूचित जाती, जमाती सेलच्या कार्यकर्त्यांना केले
ओबीसींच्या प्रश्नांवर मंत्री उपसमिती बनते. त्याच्या अध्यक्षपदी ओबीसी मंत्र्याला नियुक्त केले जाते. मराठा आरक्षण विषयावर उपसमितीच्या अध्यक्षपदी मराठा मंत्र्याची वर्णी लागते. मात्र पदोन्नतीच्या विषयावरील उपसमितीचे अध्यक्ष दलित मागासमधील मंत्र्यास न करता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नेमण्यात आले, असे का?, असा सवाल राऊत यांनी विचारला.
नितीन राऊत यांच्या मागणीवर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी देखील भाष्य केलं आहे. ‘भाजपा सत्तेसाठी लाळ ठिपकत बसलेला आहे. महाविकास आघाडीतील पक्षाला बदनाम करून येनकेन मार्गाने सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करत असताना अजित यांच्या घरावर मोर्चा नेण्यापेक्षा महाविकासआघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र येऊन पदोन्नतीतील आरक्षण हा प्रश्न सोडवावा. पदोन्नती ही समाजकल्याण खात्यापुरती मर्यदित नसून सर्व खात्यात पदोन्नती पदे रिकामी आहेत त्यामुळे समितीचे नेतृत्व फुले, शाहू, आंबेडकर विचाराचे अजित पवार करत आहे ध्यानात ठेवाव,’ असा सल्ला वजा इशाराच सचिन खरात यांनी नितीन राऊत यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्र्यांना बैठकीसाठी गपचूप मागच्या दाराने यावं लागतं यापेक्षा अधिक नामुष्की काय असू शकेल?’
- देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या यादीत पुणे अव्वल, तर टॉप-१० मध्ये राज्यातील ९ जिल्हे
- पक्षाने आदेश दिल्यास मी पंढरपूरमधून पोटनिवडणूक निश्चितपणे लढवीन – राम शिंदे
- ‘या’ कारणासाठी उस्मानाबाद पालिकेने पटकावला राज्यात पहिला क्रमांक
- टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण ; ‘हा’ खेळाडू इतक्या दिवस राहू शकतो क्रिकेटपासून दूर


