Share

सरकारवर टिका करण्यापेक्षा केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी जोर लावा ! ; थोरातांचा भाजप नेत्यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महाराष्ट्रातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडला आहे. या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. आशातच आर्थिक मदतीवरून राज्यात राजकारणही तापले असून विरोधी पक्षाकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात आहे. परंतु आमच्यावर टीका करण्याऐवजी सप्टेंबर अखेर राज्याचे हक्काचे असलेले जीएसटी परताव्याचे तब्बल ३० हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणे बाकी आहेत. ते पैसे मिळवण्यासाठी राज्यातील भाजपच्या मंडळींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी महसूलमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, राज्यातील भाजपचे नेते शेतकऱ्यांना मदतीच्या मोठमोठ्या मागण्या करत आहेत, पण केंद्र सरकारकडे असलेले जीएसटीचे ३० हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळावेत यासाठी प्रयत्न करत नाहीत. त्यांनी पोकळ गप्पा मारण्यापेक्षा जीएसटीचे पैसे आणावेत तसेच राज्याला केंद्र सरकारकडून मोठी आर्थिक मदत मिळावी यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे प्रयत्न करावा. आम्ही त्यांचे अभिनंदन करू, असे थोरात म्हणाले.

सध्या राज्य सरकारला केंद्राची कुठलीही मदत नसल्यामुळे राज्य सरकारने पगार आणि इतर दैनंदिन खर्चासाठी लागणारा ५५ हजार कोटी रुपयांचा निधी कर्ज रोख्यांच्या माध्यमातून उभारला आहे. कोरोनामुळे महसूल कमी झाला आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू असून ही परिस्थिती बदलल्यानंतर चित्र बदलेल. परंतु, सद्यस्थितीत कर्ज काढावे लागत आहे. महाराष्ट्र हे केंद्र सरकारला सर्वात जास्त कर देते परंतु राज्याला मदत करताना केंद्राकडून हात आखडता घेतला जातो, असे थोरात म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!