मुंबई : क्रिकेट जगतात सगळीकडे उत्सुकता लागली आहे ती जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. हा सामना २ दिवसानंतर सुरु होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
डब्ल्युटीसी सामन्यात भारतीय संघाने केवळ एकच फिरकीपटुला संघात स्थान दिले. तर पाच वेगवान गोलंदाजाचा १५ सदस्यीय संघात समावेश केला आहे. यात भारताचा सध्याच्या घडीला सर्वात अनुभवी गोलंदाज इंशात शर्माचा समावेश आहे. यासामन्याच्या पार्श्वभूमिवर इशांतने भारतीय गोलंदाजीच्या रणनितीविषयी खुलासा केला आहे. चेंडुला लाळ लावली तर चेडुंला स्विंग मिळत असते. मात्र मागील वर्षभरापासुन कोरोना संसर्गामुळे चेंडुला लाळ लावण्यास आयसीसीने बंदी घातली आहे. पण इंग्लंडमधील वातारणाचा विचार करता चेंडुला लाळ न लावताही रिव्हर्स स्विंग करता येईल. संपुर्ण सामन्यात एखाद्या गोलंदाजाला ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. असे इशांत म्हणाला.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना त्याने हे वक्तव्य केले. यावेळी त्याने पुढे बोलताना त्याने भारतीय खेळपट्टीचा दाखला देताना म्हणाला की, ‘भारतीय खेळपट्टीवर चेंडु हा उशीरा स्विंग होत असतो. मात्र इंग्लंडमध्ये तसे नाही. जर चेंडुचा टप्पा पुढे ठेवला तर येथील खेळपट्टीवर नियमीत स्विंग मिळु शकतो.’ कसोटी सामन्यात इशांत शर्मा हा भारताचा एकमेव गोलंदाज आहे ज्याने १०० कसोटी सामने खेळलेले आहे.
महत्वाच्या बातम्या
- इंग्लंडला नमवून डब्ल्युटीसी फानयलसाठी न्यूझीलंडचा संघ साऊथम्पटनमध्ये दाखल
- नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलोय – चंद्रकांत पाटील
- मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन – संभाजीराजे
- सुशांतच्या मृत्यूवर आधारित ‘सुसाईड’ वेब सीरिजचं पोस्टर रिलीज
- महा आवास अभियान ग्रामीण; लातूर जिल्ह्यातील दोन हजार कुटुंबांचे स्वप्न साकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

