मुंबई : आयसीसी आयोजीत जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना दोन दिवसावर येउन ठेपला आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मंगळवारी १५ जुन रोजी दुपारी न्युझीलंडने या सामन्यासाठी संघाची घोषणा केली. यानंतर काही वेळातच बीसीसीआयने देखील या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली.
या लढतीपुर्वी न्युझीलंडचा संघ हा इंग्लंडविरुद्ध २ सामन्याची कसोटी मालिका खेळत होता. ही मालिका संपुष्टात येताच न्युझीलंडचा संघ साउथहॅम्पटनला पोहोचला आहे. न्युझीलंड क्रिकेट बोर्डाच्या ट्वि्टर हँडलने ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे. या व्हिडीओत खेळाडु हे हॉटेमध्ये जात असताना दिसत आहे. न्युझीलंडच्या संघाने नुकत्याच पार पडलेल्या २ कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० अशा विजय मिळवला होता.
Arriving in Southampton ???? #WTC21 pic.twitter.com/IaVRY9EfbX
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 14, 2021
विजयाचा आत्मविश्वास घेत न्युझीलंडचा संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज झाला आहे. यादरम्यान न्युझीलंडने या सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. मात्र कर्णधार केन विल्यमसन हा अद्यापही दुखापतीतुन पुर्णपने सावरला नसल्याने त्याच्या खेळण्याबद्दल साशंकता आहे. तसेच इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजयामुळे अंतिम सामन्यात न्युझीलंडचा संघ अंतिम सामन्यात जागतीक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकावरील संघ म्हणून खेळायला उतरेल.
महत्वाच्या बातम्या
- कसोटी महाभारत! अंतिम लढतीसाठी भारतीय संघाची घोषणा
- तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद मनपाला हवेत ७७ कोटी ७३ लाख रुपये, राज्यशासनाकडे पाठवला प्रस्ताव!
- बीडमध्ये रेशन दुकानदारकडून लाच घेतना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
- सुखद! मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या घरातील तीन जणांची एसटीत नियुक्ती
- पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात औरंगाबादेत बहुजन मुक्ती पार्टीचे ‘वाहनांना धक्का’ मारो आंदोलन!


