मुंबई : १४ जुन २०२० या दिवशी संपुर्ण बॉलिवुड जगताला हादरवुन टाकणारी घटना समोर आली. बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. नुकतेच सुशांतच्या मृत्यूला वर्षपूर्ती झाली आहे. सुशांतच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वाला धक्का बसला होता. त्याच्या चाहत्यांना देखील याचा खूप मोठा धक्का बसला होता. अशातच सुशांतच्या मृत्यूवर आधारित ‘सुसाईड’ या वेब सीरिजचं पोस्टर लॉंच करण्यात आल आहे.
याआधी सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी एका याचिकेत सुशांतच्या जीवनावर आधारित विविध चित्रपटांवर स्थगिती आणण्याची मागणी केली होती. पण न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका फेटाळली होती. त्यानंतर आता सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त त्याच्या मृत्यूवर आधारित असलेल्या ‘सुसाईड: हकीकत या षडयंत्र’ या वेब सीरिजचं पोस्टर लॉंचिंग करण्यात आल आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शक आणि कलाकारांच्या उपस्थितीत हा पोस्टर लॉंचिंग सोहळा पार पडला.
ही वेब सीरिज सुशांत सिंह राजपूतच्या जन्मदिनी म्हणजेच येत्या २१ जानेवारी २०२२ मध्ये रिलीज करण्यात येणार आहे. एकूण आठ एपिसोडमध्ये ही वेब सीरिज दाखवण्यात येणार असल्याचं देखील म्हंटले जात आहे. या सीरीजमध्ये अभिनेता आर्यपुत्र मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. या सीरिजमध्ये शशांक नावाचं काल्पनिक पात्र दाखवण्यात येणार आहे जे सुशांतवर आधारित आहे. अविनाश बावनकर हे या वेब सीरिजचे लेखक तसंच दिग्दर्शक असून, आदित्य गर्ग हे या सीरिजचे निर्माते आहेत.
महत्वाच्या बातम्या
- तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद मनपाला हवेत ७७ कोटी ७३ लाख रुपये, राज्यशासनाकडे पाठवला प्रस्ताव!
- बीडमध्ये रेशन दुकानदारकडून लाच घेतना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
- सुखद! मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या घरातील तीन जणांची एसटीत नियुक्ती
- पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात औरंगाबादेत बहुजन मुक्ती पार्टीचे ‘वाहनांना धक्का’ मारो आंदोलन!
- राहुल गांधींची वादग्रस्त प्रकरणी टीका आणि योगींनी संतापात राहुल गांधींची लाजच काढली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

