Share

राज्य सरकारचीच चौकशी करा; परमबीर सिंह यांची न्यायालयात याचिका

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते. अंबानी स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी सचिन वाझे याचे नाव आल्यानंतर परमबीर सिंह यांची बदली करण्यात अली होती. यानंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून हे गंभीर आरोप केले होते.

दरम्यान, या सर्व प्रकरणाची सध्या सीबीआय चौकशी सुरु असून अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता या प्रकरणात आणखी एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केले असून परमबीर सिंह यांच्यावर आणखी गंभीर आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याचे समजत आहे.

परमबीर सिंह यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. अकोल्याच्या पोलीस निरीक्षक पदावरील एका अधिकाऱ्याने याबाबतचे गंभीर आरोप केले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना याबाबत पत्र देखील लिहिले आहे. परमबीर सिंह गोटात येणार अशा चर्चा सुरु असतानाच आता परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन राज्य सरकारचीच चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

राज्य सरकारने परमबीर सिंग यांची दोन प्रकरणात चौकशी लावली आहे. या चौकश्यांविरोधात सिंग यांनी आज दुपारी कोर्टात याचिका दाखल केली आहे. ’19 एप्रिल रोजी मी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना भेटलो होतो. यावेळी त्यांनी तुम्ही केलेल्या तक्रारी मागे घ्या. अन्यथा तुमच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू करण्यात येणार आहे, असं मला सांगितलं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी,’ अशी मागणी सिंग यांनी याचिकेत केली आहे. या याचिकेत त्यांनी राज्य सरकारवरच गंभीर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर, ४ मे रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!