पुणे : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. तर, प्रकुर्ती खालावल्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. राजीव सातव यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी देखील त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.
दरम्यान, सातव उपचाराला प्रतिसाद देत असल्याची माहिती काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. ’19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 25 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली’ अशी माहिती विश्वजीत कदम यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील कोविड टास्क फोर्समधील डॉक्टर शशांक जोशी, राहुल पंडित त्यांच्या उपचारावर लक्ष ठेवून आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात जहांगीर हॉस्पिटलमध्ये सातव यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी येणार असल्याचंही कदम यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांनी शिल्लक सोयाबीन बियाणे इतरांना द्यावे, मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन
- ‘युपी, गुजरातपेक्षा महाराष्ट्रात परिस्थिती चांगली’, मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया
- ‘सभा, कमी लसीकरणामुळे भारतात परिस्थिती बिघडली’, डब्ल्यूएचओने सुनावले
- पोलिसांच्या चकमकीत दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा
- ‘मोदींच्या मुत्सद्दीपणामुळे विदेशातून मदतीचा ओघ’, देवेंद्र फडणवीस यांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

