Share

बंगळुरूमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर फेकली शाई ; कार्यक्रमस्थळी गोंधळ

Published On: 

🕒 1 min read

बंगळुरू : कर्नाटकात शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या सुरक्षेत मोठी कुचराई झाल्याची घटना समोर आली आहे. राकेश टिकैत यांच्यावर सोमवारी बंगळुरूमध्ये काही लोकांनी हल्ला केला होता. प्रथम टिकैत यांच्यावर माईकने हल्ला करण्यात आला. यानंतर आणखी एका व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली. टिकैत यांच्यावर हल्ला करणारे लोक स्थानिक शेतकरी नेते के चंद्रशेखर यांचे समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर राकेश टिकैत यांच्या समर्थकांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पकडून शाई फेकली. कार्यक्रमात खुर्च्याही फेकण्यात आल्या.

येथील स्थानिक माध्यमांनी नुकतेच के चंद्रशेखर यांच्याबद्दल एक स्टिंग केले होते. या व्हिडिओमध्ये चंद्रशेखर यांनी बस संपासाठी पैशांची मागणी केली होती. एवढेच नाही तर राकेश टिकैत यांच्यासह अन्य शेतकरी नेत्यांचाही उल्लेख केला होता.

राकेश टिकैत यांना बेंगळुरूमध्ये माध्यमांशी संवाद साधताना के चंद्रशेखरबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की चंद्रशेखरशी माझा काहीही संबंध नाही. राकेश टिकैत म्हणाले, चंद्रशेखर हा फसवणूक करणारा आहे. यानंतर अचानक चंद्रशेखर यांच्या एका समर्थकाने राकेश टिकैत यांच्यावर शाई फेकली. शाई हल्ल्यानंतर शेतकरी नेते टिकैत यांनीही राज्यातील भाजप सरकार कार्यक्रमस्थळी सुरक्षा पुरवत नसल्याचा आरोप केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!