मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामातील अंतिम सामना रविवारी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात संघाने राजस्थानचा सात गडी राखून पराभव केला. पहिल्याच हंगामात गुजरातने थेट विजेतेपदाला गवसणी घातली. यंदाच्या संपूर्ण हंगामात गुजरात संघाचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या हार्दिक पंड्याने दमदार कामगिरी करून दाखवली. हंगाम सुरू होण्यापूर्वी हार्दिक पंड्याची पाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे तो मागील काही काळापासून सतत फिटनेसच्या जाळ्यात अडकलेला होता. त्यामुळे तो यंदाच्या हंगामात पुनरागमन करू शकेल की नाही याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सुपर १० स्टेजमधून बाहेर पडल्यानंतर, पंड्याने त्याच्या फिटनेसवर काम करण्यासाठी खेळातून विश्रांती घेतली होती. विशेषत: त्याने त्याच्या वेगवान गोलंदाजीकडे जास्त लक्ष दिले. याचा फायदा आयपीएल हंगामात खेळताना फ्रेंचायझीसाठी तो एक मौल्यवान खेळाडू बनला.
एमएस धोनीलाही टाकले मागे
आयपीएल विजेतेपदासह हार्दिक पंड्याने त्याचा गुरू धोनीला मागे टाकले आहे. रोहित शर्मानंतर पहिल्याच कर्णधारपदात संघाला विजेतेपद मिळवून देणारा तो दुसरा भारतीय कर्णधार तर ठरलाच, पण त्याने एक खेळाडू म्हणून धोनीलाही मागे टाकले आहे. हार्दिक पंड्या ४ वेळा मुंबई इंडियन्सच्या विजेतेपदाचा भाग होता आणि आता त्याने गुजरात टायटन्ससाठी एकदा विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे, धोनी ४ वेळा आयपीएल विजेत्या संघाचा भाग होता. म्हणजे धोनीच्या बाबतीत हार्दिकने आयपीएल विजेतेपदाच्या संघात ५ वेळा सहभागी होण्याचा मान मिळवला आहे.
????. ????. ????. ????. ????. ????. ????. ????. ????! ???? ????
That moment when the @gujarat_titans captain @hardikpandya7 received the IPL trophy from the hands of Mr. @SGanguly99, President, BCCI and Mr. @JayShah, Honorary Secretary, BCCI. ???? ????#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/QKmqRcemlY
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
आयपीएल २०२२ मध्ये हार्दिक पंड्याने संघाचे कर्णधारपद सांभाळले व त्यासोबतच स्वतःच्या अष्टपैलू क्षमतेची झलक दाखवली. त्याने या स्पर्धेत खरोखरच ती सर्व कर्तव्ये चोख बजावली. रविवारी त्याने गुजरातचे घरेलू मैदान असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी केली. या अंतिम सामन्यात पंड्याने १७ धावांत ३ गडी बाद केले. तर फलंदाजीमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करत ३४ धावांचे योगदान दिले. या सामन्यात राजस्थानी प्रथम फलंदाजी करताना गुजरातला १३० धावांचे लक्ष दिले होते. गुजरातने ७ गडी राखून या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत आयपीएल विजेतेपद पटकावले.
महत्वाच्या बातम्या:


