🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सला गुजरात टायटन्सकडून (GT vs RR) पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थान संघाने या हंगामात दमदार खेळ केला. कप्तान संजू सॅमसनही आपल्या संघाच्या कामगिरीवर समाधानी दिसत होता. अंतिम फेरीत पराभव झाला असला तरी सॅमसनने आपल्या संघाच्या कामगिरीचा अभिमान बाळगला.
संजू सॅमसन म्हणाला, ”हा हंगाम आमच्यासाठी खूप खास होता. शेवटचे दोन-तीन हंगाम सर्वांसाठी कठीण काळ होते. त्यांना काही आनंदाचे क्षण देण्यासाठी हा हंगाम चांगला गेला आहे. मला माझ्या संघाचा खरोखर अभिमान आहे. संघात अनेक महान युवा आणि वरिष्ठ खेळाडू आहेत. आजचा दिवस आमच्यासाठी सुट्टीचा दु:खद ठरला पण मला माझ्या संघाचा मला अभिमान आहे. लिलावापासून आम्हाला चांगले गोलंदाज हवे होते, ते तुम्हाला स्पर्धा जिंकवतात.”
All to be proud of, Skip. ???? pic.twitter.com/EuJ49zab1D
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 30, 2022
राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा म्हणाला, ”ज्या प्रकारे संघाने खरोखर लक्ष केंद्रित केले, ते एकत्र आले आणि उत्कृष्ट क्रिकेट खेळले. जोस बटलरने खूप मोठे योगदान दिले. ९ खेळाडूंचा एक चांगला कोअर ग्रुप होता. फॉर्मवर आधारित काही बदलांसह, ही एक उत्तम फ्रेंचायझी आहे.”
असा रंगला सामना…
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात पहिल्या हंगामात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ (IPL 2022)चे विजेतेपद पटकावले आहे. सव्वा लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सला (GT vs RR) ७ गड्यांनी मात दिली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने २० षटकात ९ बाद १३० धावा केल्या. हार्दिक पंड्याने संजू सॅमसन, जोस बटलर आणि शिमरॉन हेटमायर या तिघांना बाद करत राजस्थानचे कंबरडे मोडले. प्रत्युत्तरात गुजरातकडून सलामीवीर शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या यांनी सावध आणि संयमी फलंदाजी केली. १९व्या षटकात गुजरातने विजयावर शिक्कामोर्तब केले. हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

