🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकताच कंगनाचा ‘धाकड’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. तिच्या धाकड या चित्रपटासाठी अभिनेता सलमान खानने शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु हा कंगनासाठी खूप खास असलेला चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर अत्यंत वाईट पद्धतीने फ्लॉप झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाने आठ दिवसांत फक्त तीन कोटींची गल्ला जमवला आहे, असे असले तरी कंगना आता पुढच्या प्रोजेक्टसाठी तयारीला लागली आहे. आता कंगनाची आपल्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे.
दरम्यान कंगना आता दिल्लीच्या विमानतळावर दिसून आली आहे. दिल्ली विमानतळावरील तिचा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. कंगनाला तिच्या अत्यंत वाईट रित्या फ्लॉप झालेल्या ‘धाकड’ चित्रपटासाठी नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जात आहे. कंगनाच्या व्हिडीओवर एका यूजरने लिहिले ‘वाय प्लस सिक्युरिटीनंतरही चित्रपट हिट होऊ शकला नाही’. तर आणखी एका यूजरने म्हटले आहे की, ‘आणखी एक चित्रपट फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहे’. दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, ‘१० वा चित्रपट फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहे’.
‘धाकड’ चित्रपटच्या रिलीजच्या आठव्या दिवशी चित्रपट पाहण्यासाठी फक्त २० लोक आले होते. यानंतर लोक कंगनाची खिल्ली उडवू लागले. एका यूजरने लिहिले आहे की, यापेक्षा जास्त लोक जेसीबीची खोदाई पाहण्यासाठी येतात. आणखी एका युजरने म्हटले आहे की, सापांचा खेळ पाहायला सुद्धा जास्त लोक येतात. आगामी इमर्जन्सी या चित्रपटात कंगना आता इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटासंदर्भात अजूनही जास्त काही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

