Share

मराठी कलाकार झाले रंगात बेधुंद ; जोडीदारासोबत पहिलीच होळी

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाचे सावट असले तरी होळीचा उत्साह जराही कमी झालेला नाही. मराठी मनोरंजन विश्वातल्या काही सेलिब्रेटींसाठी मात्र यंदाची होळी खूपच खास असणार आहे. यावर्षाच्या सुरुवातीलाच काही मराठी सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. आपल्या जोडीदारासोबत यावर्षी पहिल्यांदाच ते होळीचा सण साजरा करणार आहेत.

स्वप्नाली-आस्ताद काळे अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. पती-पत्नी म्हणून दोघांची ही पहिलीच होळी आहे. मिताली-सिद्धार्थ चांदेकर मनोरंजन विश्वातलं क्यूट कपल अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नवीन वर्षाच्या सुरुवातीस लग्नाच्या बेडीत अडकले. ही जोडी लग्नाअगोदर दोन वर्षं रिलेशनशीपमध्ये असली, तरी लग्नानंतर त्यांची ही पहिलीच एकत्र होळी असणार आहे.

मानसी-प्रदीप खरेरा मागील वर्षी मानसी आणि तिचा प्रियकर प्रदीपने साखरपुडा केला होता. या वर्षाच्या सुरुवातीलाच ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. मानसीच्या यंदाच्या होळीला पती प्रदीपमुळे हरियाणवी टचही मिळणार आहे.  प्रसिध्द अभिनेत्री अभिज्ञा भावेने 6 जानेवारी रोजी प्रियकर मेहूल पैसोबत लग्नगाठ बांधली. अभिज्ञाचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. पती मेहूलसोबत अभिज्ञाची ही पहिलीच होळी असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!