औरंगाबाद : शहरात रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप लांबविला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. चोरीच्या या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेसमोर आव्हान उभे राहीले आहे. तीन कार आणि एक बसची काच फोडून चोरट्यांनी किमती वस्तुंवर हात मारला.
शहरातील अपेक्स हॉस्पीटल येथे घनश्यामदास भुतडा आणि त्यांची पत्नी शोभा उपचार घेत होते. त्यांना भेटण्यासाठी त्यांचा पुतण्या स्वराज भुतडा हे पुण्याहून कार घेऊन आले होते. शनिवारी त्यांनी आपली कार पार्किंगजवळ उभी करुन हॉस्पिटलमध्ये गेले. रात्रभर ते हॉस्पिटल मध्येच होते. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी कारजवळ आल्यावर त्यांना कारची काच फोडुन चोरी झाल्याचे समजले. कारमधून त्यांचा लॅपटॉप चोरीला गेला आहे.
याच ठिकाणी उभ्या असलेल्या शरद ओमप्रकाश राठी, सुहास जैन यांच्या कारचीही काच चोरट्यांनी फोडल्याचे आढळुन आले. तसेच गुरविंदर राजू सेठी यांच्या बसची काच देखील फोडण्यात आली होती. यात शरद राठी यांच्या कारचे २० हजाराचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी स्वराज भुतडा यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएल लिलावाआधीच ‘या’ टीमनं बदललं नाव!
- रमेश शेळके हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना ठोकल्या बेड्या
- “त्यांचा मृत्यू त्यांच्या इच्छेनुसारच झाला आहे, शेतकरी आंदोलनावर हरियाणाच्या कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य”
- नांदेडच्या गुरपिंदसिंगची पुराव्याआभावी मुक्तता
- तामिळनाडू, राजस्थानच्या धर्तीवर मराठा समाजाला वेगळा न्याय ही भूमिका पटली नाही : अशोक चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
