Share

‘जखमी’ कॉनवेने दाखवला ऑस्ट्रेलियाला हरवण्याचा ध्यास; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

Published On: 

दुबई : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सध्या  आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) रोजी म्हणजेच आज संध्याकाळी भारतीय वेळेनुसार ७.३० वाजता सुरु होणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन बलाढ्य संघ आमने सामने खेळणार आहेत.

दरम्यान, सामन्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला, ज्यामध्ये कॉनवे आपला संघ सहकारी टीम सिफर्टकडून यष्टिरक्षणाचा सराव करून घेताना दिसून येत आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

डेवोन कॉनवेला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले होते. परंतु इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तो गंभीर दुखापतग्रस्त झाला आणि त्यामुळे त्याला अंतिम सामन्यात विश्रांती देण्यात आली.

दुखापतग्रस्त डेव्हॉन कॉनवेच्या जागी अंतिम सामन्यासाठी टीम सेफर्टचा संघात समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज डेव्हन कॉनवे याच्या उजव्या हाताला उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर फ्रॅक्चर झाला होता, त्यानंतर तो T20 विश्वचषक तसेच किवी संघाच्या भारत दौऱ्याच्या अंतिम फेरीतून बाहेर पडला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!