🕒 1 min read
दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या पांचजन्यमध्ये इन्फोसिसबाबत धक्कादायक विधान करण्यात आले आहे. ‘साख और आघात’ या मथळ्याखाली पांचजन्यने चार पानी कव्हर स्टोरी छापली असून ही भारतातील अग्रगण्य आयटी कंपनी संबंधित लिहिण्यात आली आहे. इन्फोसिस राष्ट्रविरोधी शक्तींसोबत आहे. इन्फोसिस नक्षल, वामपंथी आणि तुकडे-तुकडे गॅंगला मदत करते, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
दरम्यान, यामुळे एकच खळबळ उडाली असताना संघाकडून आता स्पष्टीकरण देण्यात आले आहे. RSS चे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. ‘एक भारतीय कंपनी म्हणून, इन्फोसिसने देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. इन्फोसिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या पोर्टलमध्ये काही समस्या असू शकतात, परंतु पाचजन्य यांनी या संदर्भात प्रकाशित केलेला लेख केवळ लेखकाचे वैयक्तिक मत प्रतिबिंबित करतो,’ असं आंबेकर यांनी म्हटलं आहे.
अतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को इस लेख में व्यक्त विचारों से नहीं जोड़ा जाना चाहिए । @editorvskbharat
— Sunil Ambekar (@SunilAmbekarM) September 5, 2021
यासोबतच, ‘पाचजन्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र नाही आणि त्यात नमूद केलेला लेख किंवा मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडली जाऊ नयेत,’ असं देखील सुनील आंबेकर यांनी नमूद केलं आहे. दरम्यान, इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी सरकारने एक ई-फाइलिंग पोर्टल तयार केले आहे. हे पोर्टल इन्फोसिस ने तयार केलं असून या पोर्टलचा उपायोग करताना लोकांना वारंवार अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळेच वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील इन्फोसिसकडे नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने १५ सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बंदुकीसह करुणा शर्मा परळी पोलिसांच्या ताब्यात, धनंजय मुंडे समर्थक शेकडो महिला ठाण्याबाहेर जमा
- ‘सत्तेसाठी लाचार शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसली’, आ. सावे यांचे दानवेंना प्रत्युत्तर!
- ‘आव्हान देतो…शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडेन’
- संघासारख्या देशभक्तांमुळे भारत हिंदुराष्ट्र होतोय म्हणून ते निराश; राणेंची अख्तर यांच्यावर टीका
- मोठी बातमी! करुणा शर्मांच्या गाडीत बंदूक सापडल्याने खळबळ, धनंजय मुंडे व कुटुंबांचा घात करण्याचा डाव?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
