Share

‘सत्तेसाठी लाचार शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसली’, आ. सावे यांचे दानवेंना प्रत्युत्तर!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत मोदीजींचा फोटो लावून शिवसेनेने मते घेतली, तर विधानसभेत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर जनतेने यांना मत दिले. लोकभावनेचा अनादर करून लाचार शिवसेना सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसली आहे. आयुष्यभर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला शिव्या दिल्या. तीच काँग्रेस आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला प्रिय झाली आहे. भाजपचे आमदार अतुल सावे यांनी अशाप्रकारे शिवसेनेवर निशाणा साधला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डॉक्टर आणि संजय राऊत यांना कंपाउंडर संबोधल्यानंतर पुन्हा सेना नेते खवळले आहेत. होय, उद्धव ठाकरे निष्णात डॉक्टरच आहेत. त्यांनी २०१९ ला मोठी राजकीय सर्जरी केली, त्याचे परिणाम भाजपला कित्येक वर्षे भोगावे लागतील. असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार अंबादास दानवे यांनी भाजपला लगावला आहे.

त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे आमदार अतुल सावे म्हणाले, शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार सोडले आणि हिंदुत्वाला तर यांनी तिलांजली दिली आहे. देशभरात कोरोना संसर्ग कमी झाला आहे. अनेक राज्यांनी मंदिराची दारे भक्तांसाठी खुली केली आहेत. राज्यात मात्र अजूनही देवस्थाने कुलूपबंद आहेत. ज्यावर हजारो कुटुंबांचे पोट आहे. त्या मंदिरानाच सरकारने टाळे ठोकले, मंदिर कधी उघडणार तेवढे शिवसेनेने बोलावे, असा सवाल आमदार अतुल सावे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!