पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष-आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार टीका-टिपण्णीचे सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी चंद्राकांत पाटील यांनी पाठीत खंजीर खुपसणारे दोन चेहरे समोर येतात असं म्हटल्यावर उपस्थितीत कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतले होते. यावरून आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पलटवार केला आहे.
संजय राऊत हे सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज शिरुर-हवेली इथे आले होते. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राऊत यांनी थेट चंद्रकांत पाटील यांनाच ललकारले. ‘चंद्रकांतदादा हरिश्चंद्राचे अवतार आहेत. आम्ही एकत्र काम केलंय. मी तर नेहमी आव्हान देतो शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो,’ अशी गर्जना संजय राऊत यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते ?
‘पाठीत खंजीर खुपसणारे असं म्हटलं केलं की आधी एकाच नेत्याचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. मात्र आता पाठीत खंजीर खुपसणारे म्हटल्यावर आणखी एक दुसरा चेहरा नजरेसमोर येतो,’ असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता.
यासोबतच, ‘काही पक्ष आपल्यासोबत प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्ष, विनायक मेटेंच्या शिवसंग्राम, महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोतांच्या रयत क्रांती संघटनेचा समावेश होतो. याशिवाय आणखी काही छोटे पक्ष सोबत आहेत. मात्र काही जणांची स्थिती नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी आहे. ५६ आमदार असताना ते मुख्यमंत्री झाले आहेत,’ असा खोचक टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना नियमांना हरताळ ; शरद पवार, दिलीप वळसे पाटलांच्या कार्यक्रमात तुफान गर्दी
- खळबळजनक ! RSS चे मुखपत्र पांचजन्य म्हणतंय, ‘इन्फोसिस तुकडे-तुकडे गॅंगचा भाग’
- ‘ते जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांचा एकही सिनेमा या मातृभूमीत चालू देणार नाही’
- ‘मनी हाईस्ट’वरून यशोमती ठाकूर यांचं राजकीय ट्विट, ‘तो लुटायलाच आलाय, पण जगासमोर मसिहा..’
- पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुण्याच्या महापौरांची निवड

