🕒 1 min read
बीड : राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे हे काही वर्षे करुणा शर्मा यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. मात्र, त्यांच्यात बिनसल्याने त्यांच्या नातेसंबंधाचा वाद कोर्टात गेला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, याच दरम्यान करुणा शर्मा यांनी परळीत येऊन पत्रकार परिषद घेण्याचा इशारा दिला होता. या पत्रपरिषदेत माझ्या आईचा मृत्यू कसा झाला? बहिणीसोबत काय झाले? याचा पुराव्यानिशी खुलासा करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
मात्र, आज करुणा शर्मा परळीत आल्या असता पोलिसांनी त्यांच्या वाहनाची तपासणी केली. त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, करुणा शर्मांच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळल्याने त्यांच्या मंत्री धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय धनंजय मुंडे समर्थकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे परळी शहरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या असून शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच, पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप करत करुणा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे.
‘परळी माझे सासर आहे आणि मी आता परळीतच रहायला येत आहे. मी मुला बाळांसह येणार आहे. मी आल्यावर मला जिवंत जाळले तरी चालेल, पण मी येणारच आहे’, असा व्हिडिओ करुणा शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तसेच आज सकाळपासून आपण कोठे आहोत, अन् कोठे जाणार आहोत याची माहिती फेसबूकवरून त्या देत होत्या. मात्र, त्यांनी दिलेल्या वेळेत पत्रकार परिषद झाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना नियमांना हरताळ ; शरद पवार, दिलीप वळसे पाटलांच्या कार्यक्रमात तुफान गर्दी
- खळबळजनक ! RSS चे मुखपत्र पांचजन्य म्हणतंय, ‘इन्फोसिस तुकडे-तुकडे गॅंगचा भाग’
- ‘ते जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांचा एकही सिनेमा या मातृभूमीत चालू देणार नाही’
- ‘मनी हाईस्ट’वरून यशोमती ठाकूर यांचं राजकीय ट्विट, ‘तो लुटायलाच आलाय, पण जगासमोर मसिहा..’
- पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुण्याच्या महापौरांची निवड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
