औरंगाबाद : गंगापूर – खुलताबादचे आमदार प्रशांत बंब हे गंगापूर तालुक्यातील मनी लॉन्डरींगचे विजय मल्ल्या असल्याचा आरोप कृष्णा पाटील डोणगावकर यांनी पत्रकार परिषेमध्ये केला. बंब यांनी गंगापूर साखर कारखान्याचे १५ कोटी ७५ लाख रुपयांच्या अपहार केला आहे. तर या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करुन ३ महिन्यापेक्षा जास्त कालावधी होवून देखील मुख्य आरोपी आमदार प्रशांत बंब वर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही असा आरोप त्यांनी केला.
कृष्णा पाटील डोणगावकर म्हणाले, बंब हे राजरोसपणे फिरताना दिसत आहेत. प्रशांत बंबसह १६ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतू यातील दोन आरोपींना वैजापूर न्यायालयाने जामीन दिला आहे. यातील १२ पैकी ६ आरोपी फरार आहेत. तर या प्रकरणामध्ये २०११ रोजी ९ कोटी भरले होते. यावेळी कारखान्याने दैनिकात प्रकाशित केलेल्या प्रसिद्धीपत्रक दिले होते. या नंतर या माध्यमातून हे पैसे कारखान्याला मिळाले होते. ते हे पैसे आहेत. या मध्ये प्रशांत बंब यांनी खोटे, बनावट कागदपत्रे करुन खोटे मुख्त्यार नामे तयार केली. परिसिमा म्हणावी की एका मृत दादा नारायण पाटील या व्यक्तीचे खोटे मुख्य्त्यार पत्र तयार केले. आणि शिंदे नावाचा कोणताही व्यक्ती शेतकरी नसतांना त्यांचेही मुख्य्त्यारपत्र लिहून घेतले आहे.
प्रशांत बंब यांनी इंडिया बुल्स या कंपनीतून खोटी आणि बनावट कागदपत्र तयार करुन कमी व्याज दरामध्ये दुसऱ्यांच्या नावाने कर्ज उचलून तिसरीकडे खर्च करण्याचा त्यांचा धंदा आहे. त्यामुळे ते गंगापूर साखर कारखान्यातील १५ कोटी ७० लाख त्यांच्या समर्थकांच्या खात्यावर साखर कारखान्यातील रक्कम वळवली आहे. तर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच आणी पक्षातील इतर वरिष्ठ नेते त्यांना या प्रकरणात कोणतीही कारवाई होवू न देण्यासाठी मदत करत असल्याचा आरोप देखील डोणगावकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
- खळबळ! जिल्हाधिकारी कार्यालयातून हायवाची चोरी, तिघे अटकेत
- ‘राठोडांना वेगळा अन् मुंडेंना वेगळा न्याय दिल्याने शिवसेनेत अंतर्गत वादळ’
- मुंबईकरांना बसणार आर्थिक भुर्दंड ! प्लॅटफॉर्म तिकिटात मध्य रेल्वेनं केली पाच पट वाढ
- नव्या नवरीचे नऊच दिवस; दहाव्या दिवशी झाला ह्रदयविकाराने मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

