🕒 1 min read
मुंबई: न्यूझीलँड दौऱ्यावर पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मोठी धावसंख्या उभारूनही संघ त्याचा बचाव करू शकला नाही आणि या पराभवासह त्यांना मालिकाही गमवावी लागली.
शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात एस मेघना, शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलँड समोर विजयासाठी २८० धावांचे भक्कम लक्ष्य ठेवले होते, परंतु गोलंदाजी करताना संघाला त्याचा बचाव करता आला नाही. न्यूझीलँडने पाच चेंडू बाकी असताना ७विकेट्स गमावून सामना जिंकला आणि मालिकेत ३-०अशी अभेद्य आघाडी घेतली. महिला क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसरा सर्वाधिक धावांचा पाठलाग ठरला आहे.
नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करताना भारतीय संघाने सर्वबाद २७९ धावा केल्या. मेघना आणि शेफाली यांनी संघासाठी पहिल्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. मेघनाने ४१ चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. मेघनाच्या कारकिर्दीतील जे पहिले अर्धशतक आहे. त्याचवेळी शेफालीने ५७ चेंडूत ७चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या आणि वनडे कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. त्यांच्याशिवाय दीप्तीने ६९ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६९ धावांची नाबाद खेळी खेळली.
महत्वाच्या बातम्या
- “किरीट सोमय्या आज कोर्लई गावात जाण्याचे कळताच संजय राऊतांचा थयथयाट सुरु झाला”, चंद्रकांत पाटलांनी सुनावले
- “…तो राजीनामा नव्हे, पक्षांतर्गत कारवाईच”, राहुल गांधींचे स्पष्टीकरण
- “…तर पाकिस्तानी पंतप्रधान तुम्हाला देहाती औरत म्हणाला नसता”, भातखळकरांचा मनमोहन सिंह यांच्यावर निशाणा
- बॅनर्सवर गडकिल्ल्यांची माहिती; मावळा प्रतिष्ठानकडून अनोखा उपक्रम
- IND vs WI: तिसऱ्या टी- २० सामन्यासाठी ईडन गार्डनवर असणार चाहत्यांची उपस्थिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
