🕒 1 min read
बीड: महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे हजारो बॅनर्स शहरात लावले जातात. बीडमध्ये मात्र यंदा शिवजयंतीनिमित्त मौलिक संदेश देणारे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. बीडच्या मावळा प्रतिष्ठानकडून शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे महंती सांगणारे बॅनर्स लावले आहेत.
विविध जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे हजारो बॅनर्स वर नेते आणि कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात येतात. बीडमध्ये मात्र तशा बॅनर्सला फाटा देत महाराजांच्या गड किल्ल्यांची माहिती देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. सध्या हे बॅनर्स बीडकरांसाठी आकर्षण ठरले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
Breaking News : अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ जणांना फाशी तर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा
-
खा. गिरीष बापट यांच्या घराबाहेर काँग्रेस कमिटीच्या वतीने “माफी मागो” आंदोलन
-
शिवजयंतीनिमित्त रॅली तसेच डी.जे वर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
