🕒 1 min read
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या रेवदंडा या सासूरवाडीच्या शेजारच्या कोर्लईगावात पत्नी रश्मी ठाकरेंना १९ बंगले घेऊन दिले असल्याचा आरोप केला आहे. मात्र या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हे आरोप झुगारून लावले आहेत. आज सोमय्या या बंगल्यांची पाहणी करण्यासाठीच कोर्लई गावाकडे निघाले आहेत. (Kirit Somaiya will visit Korlai village) तर या वादावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“किरीट सोमय्या आज कोर्लई गावात जायला निघालेत अशी बातमी कळताच संजय राऊत यांचा थयथयाट सुरु झाला आहे. सोमय्यांना रोखण्यासाठी राऊत पत्रकारांसमोर त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात ‘कर नाही त्याला डर कशाला?’तुम्ही कितीही धमकावलं तरी सोमय्या हे थांबणार नाहीत.” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
कोर्लई गावात असं कोणतं रहस्य दडलंय, जे लपविण्यासाठी राऊतांची एवढी धडपड सुरु आहे? सोमय्या कोर्लई गावात गेल्यास त्यांना धडा शिकवू वगैरेची भाषा कोणतं गुपित लपवण्यासाठी वापरली जात आहे? राऊतांच्या अशा थयथयाटावरून ‘दाल में कुछ काला है’, हे नक्की !
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 18, 2022
तसेच “कोर्लई गावात असं कोणतं रहस्य दडलंय, जे लपविण्यासाठी राऊतांची एवढी धडपड सुरु आहे? सोमय्या कोर्लई गावात गेल्यास त्यांना धडा शिकवू वगैरेची भाषा कोणतं गुपित लपवण्यासाठी वापरली जात आहे? राऊतांच्या अशा थयथयाटावरून ‘दाल में कुछ काला है’,हे नक्की”, असा संशयही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
कोर्लई येथील जमिनीवर एकही बांधकाम, बंगला नाही. सोमय्या यांना स्वप्नात बंगले दिसत आहेत. भाजपाच्या लोकांना बहुतेक भुताटकीने झपाटलं आहे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच त्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक आहेत. अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली यासंबंधी हे लोक बोलत नाहीत. पण अन्वय नाईक यांना ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली त्या गुन्हेगाराच्या समर्थनार्थ हे सगळे लोक कोर्टबाज्या, पत्रकबाज्या करत होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच किरीट सोमय्या देशातील सर्वांत मोठा चोर, लफंगा, आणि डाकू असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
