Share

फलंदाजी करण्यात फ्लॉप ठरलेल्या रहाणेसाठी धावून आले भारतीय दिग्गज ; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेला दिवस-रात्र सामना भारताने १० विकेट्सने जिंकला.  या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंड संघाने २२७ धावांनी या मालिकेत एकीकडे रोहित शर्मा फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. तर दुसरीकडे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर टिकांचे सत्र सुरू आहे. अशातच माजी भारतीय फलंदाज प्रवीण आमरेने रहाणेचे समर्थन केले आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात, भारतीय संघाकडून रोहितने अर्धशतक केले होते. त्याने पहिल्या डावात ६६ धावांची खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. तर दुसरीकडे मेलबर्न कसोटीमध्ये ११२ धावांची खेळी करणाऱ्या रहाणेला या मालिकेत फलंदाजी करताना अधिकाधिक धावा करण्यात अपयश येताना दिसत आहे.

अशातच माजी भारतीय फलंदाज आणि रहाणेचे फलंदाजी प्रशिक्षक आमरे यांनी त्याला समर्थन करत म्हटले आहे की, ‘सध्या फलंदाजी करणे सोपे नाही राहिले. तुम्ही पाहू शकता की मागील ८ कसोटी सामन्यात रहाणे, रोहित शर्मा आणि आर अश्विनला सोडून इतर कुणीही शतक केलेले नाही. शतकांची संख्या कमी होणे म्हणजे इकडे फलंदाजी करणे सोपे नाहीये.’

‘दुसऱ्या कसोटीत रहाणेने शतक करणे महत्वाचे होते. परंतु तो शतक करेपर्यंत टिकू शकला नाही. मात्र त्यावेळी रहाणेने रोहितसोबत मिळून दमदार भागीदारी केली होती. संघाच्या विजयात योगदान देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. असं नाही आहे की यश मिळवण्यासाठी नेहमी मोठी खेळी खेळायला हवी,’असे त्यांनी शेवटी म्हटले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!