Share

‘भारतीय टीम फायनलचे आव्हान पेलण्यास सज्ज’ ; पुजाराने व्यक्त केला विश्वास

Published On: 

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने शुक्रवारीपासून साऊथॅम्प्टनमध्ये सराव सुरु केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे होईल. टायटल सामन्याआधी टीम इंडियाने स्वत: ची तयारी करण्यासाठी इंट्रा-स्क्वॉड (त्यांच्याच खेळाडूंमधील) सामने खेळले. हा सामना 4 दिवसांचा आहे. एका संघाची कमान विराट कोहलीकडे सोपविण्यात आली आहे, तर दुसर्‍या संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे.

दरम्यान, विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर भारत आपले दोन संघ तयार करीत लढतीसाठी सज्ज होत आहे. असं भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने म्हटले आहे. न्यूझीलंडने डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत १-० ने विजय मिळवित चांगली तयारी केली आहे. असही यावेळी तो म्हंटला.

पुजारा म्हणाला,’फायनलपूर्वी दोन कसोटी सामने खेळले असल्यामुळे किवी संघ लाभाच्या स्थितीत आहे, पण फायनलचा विचार करता आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू. आमच्या संघात चांगली कामगिरी करण्याची व चॅम्पियनशिप जिंकण्याची क्षमता आहे, याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे आम्हाला त्याची चिंता सतावत नाही. आम्हाला तयारीसाठी जो १०-१२ दिवसांचा वेळ मिळाला आहे त्यात आम्ही एकाग्र राहण्यासाठी प्रयत्नशील असू. आम्ही एक सराव सामनाही खेळू आणि उपलब्ध साधनांचा सर्वोत्तम वापर करू. जर आम्ही या दिवसांचा चांगला वापर करू शकलो तर मला वाटते की आमचा संघ फायनलचे आव्हान पेलण्यास सज्ज राहील.’ असा विश्वास यावेळी पुजारने व्यक्त कला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!