अबुधाबी : आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या संसर्गामुळे स्थगित करण्यात आली. यानंतर या स्पर्धेतील अनेक विदेशी खेळाडू हे मायदेशी परतले. तर काही खेळाडु हे अबुधाबी येथे पाकिस्तान प्रिमीअर लीग स्पर्धेत सहभागी झाले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धाही काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती.
या स्पर्धेत अबुधाबी येथे शेख झायेद आंतरराष्ट्रीय मैदानावर ढाका ग्लॅडिएटर्स विरुद्ध पेशावर झाल्मी या संघादरम्यान एक सामना सुरु होता. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा फाफ डुप्लेसीस हा ढाका संघाकडुन खेळत होता. या सामन्यादरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली.
Faf du Plessis has been taken to the hospital for tests. He collided with M Hasnain during tonight’s PSL game. Get well soon, Faf ..
Two matches two major injuries first Andre Russell And now faf#FafduPlessis #QGvPZ #pzvsqg pic.twitter.com/jCjrkUjdqy— Teto Patiyaa ???????? (@Pola_620) June 12, 2021
ढाका संघाचे क्षेत्ररक्षण सुरु असताना सातव्या षटकात त्याला ही दुखापत झाली. या सामन्यात लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडु अडवताना डुप्लेसीसने सुर मारत चेंडु अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी समोरुन येत असलेला सहकाही खेळाडु मोहम्मद हसनेनच्या गुडघ्यावर त्याचे डोके आदळले.

या घटनेनंतर सामना काही काळ थांबवण्यात आला. नंतर डु प्लेसिसला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. अशातच त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर एक भावूक करणारी पोस्ट शेअर केली. तिने सोशल मीडियावर फाफ डू प्लेसिसचा फोटो शेअर करत लिहिले की, “हे हृदय चुकवणार होत आणि मला आशा आहे की त्याला त्वरित रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले असतील.”
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर इंग्लंड बॅटिंगसाठी चांगली जागा आहे’ ; अजिंक्य रहाणेने दिल्या बॅट्समनना टिप्स
- पर्यटनाच्या राजधानीत झक्कास पठाराला वेग, सारोळा येथे अडीच हेक्टर वर बीजारोपण
- नियमांचे पालन आणि लसीकरणात वाढ हाच उपाय, आ. दानवे यांचा कोरोना मुक्त गाव मोहिमेत पुढाकार
- आधारकार्ड नोंदणी ऑनलाईन कामासाठी सवलत देण्याची अल्पसंख्यांक संस्था महासंघाची मागणी
- वयोवृद्ध दांपत्याच्या घरावर चोरांचा डल्ला, २८ तोळे सोने लंपास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

