Share

ड्यू प्लेसिसनं दुखापतीनंतर दिली अपडेट, म्हणाला…

Published On: 

मुंबई : आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या संसर्गामुळे स्थगित करण्यात आली. यानंतर या स्पर्धेतील अनेक विदेशी खेळाडू हे मायदेशी परतले. तर काही खेळाडु हे अबुधाबी येथे पाकिस्तान प्रिमीअर लीग स्पर्धेत सहभागी झाले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धाही काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती.

या स्पर्धेत अबुधाबी येथे शेख झायेद आंतरराष्ट्रीय मैदानावर ढाका ग्लॅडिएटर्स विरुद्ध पेशावर झाल्मी या संघादरम्यान एक सामना सुरु होता. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा फाफ डुप्लेसीस हा ढाका संघाकडुन खेळत होता. या सामन्यादरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली होती.

ढाका संघाचे क्षेत्ररक्षण सुरु असताना सातव्या षटकात त्याला ही दुखापत झाली. या सामन्यात लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडु अडवताना डुप्लेसीसने सुर मारत चेंडु अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी समोरुन येत असलेला सहकाही खेळाडु मोहम्मद हसनेनच्या गुडघ्यावर त्याचे डोके आदळले. या घटनेनंतर सामना काही काळ थांबवण्यात आला. नंतर डु प्लेसिसला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

ड्यू प्लेसिसने ट्विट करत त्याच्या तब्येतीचं अपडेट दिलं आहे. त्याने सर्व प्रथम सर्वांना त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत. आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असून टीमच्या हॉटेलमध्ये परतल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे. दुखापत झाल्यामुळे काही काळ ‘मेमरी लॉस’ झाला होता. आता आपण पूर्ण ठीक असून पीएसएलमधील उर्वरित मॅचमध्ये खेळणार असल्याचं त्याने यावेळी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!