मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या लाटेत अनेक मान्यवरांनाही या संसर्गाची लागण झाली आहे. तसेच अनेकांना जिवही गमवावा लागला. यादरम्यान भारताचे फ्लांइग सिख म्हणून प्रसिद्ध असेलेले मिल्खा सिंग आणि त्यांची पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
कोरोनाशी झुंज देणारी त्यांची ८२ वर्षीय त्यांची पत्नी निर्मल मिल्खा सिंग या फोर्टिस हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये होत्या. येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. करोनासह अन्य् आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालावली आहे.
"Deeply saddened to know about passing away of Nirmal Milkha Singh Ji due to Post-Covid illness. She had served as the captain of India’s volleyball team and was a remarkable sportsperson. My heartfelt condolences to the family & friends," tweets Punjab CM Capt Amarinder Singh pic.twitter.com/aTaWPZYaIP
— ANI (@ANI) June 13, 2021
दरम्यान, कोरोनाचा सामना करत असलेले दिग्गज भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांच्यावर चंदीगडमधील पीजीआयएमआर (पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, मिल्खा सिंग यांची प्रकृती सुधारत आहे. निर्मल सिंग यांना २६ मे रोजी मोहालीच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांनाही त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर इंग्लंड बॅटिंगसाठी चांगली जागा आहे’ ; अजिंक्य रहाणेने दिल्या बॅट्समनना टिप्स
- डुप्लेसीसच्या गंभीर दुखापतीनंतर पत्नीची भावुक करणारी पोस्ट
- ‘…तर इंग्लंड बॅटिंगसाठी चांगली जागा आहे’ ; अजिंक्य रहाणेने दिल्या बॅट्समनना टिप्स
- औरंगाबादेत आता ‘या’ खड्डेमय रस्त्यांचे भाग्य उजळणार, मनपाकडून डांबरीकरणाची तयारी सुरु!
- शासनाची अशीही काटकसर, खाद्यतेलाचे भाव वाढल्याने पोषण आहारात तेलाऐवजी साखर!


