Share

IND vs SL : विक्रमादित्य विराटच्या कर्तृत्वाला द्रविडचा सलाम..! फोटो पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा सामना सुरु होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्टार फलंदाज विराट कोहलीचा सत्कार केला आणि त्याला त्याच्या १०० व्या कसोटीसाठी विशेष स्मृतिचिन्ह प्रदान केले. मैदानावरच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यात विराट कोहली सोबत त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील उपस्थित होती.

विराटला (virat kohli) सन्मानित करताना राहुल द्रविड (rahul dravid) म्हणाला, “तू या गोष्टी साठी पात्र आहेस, हे तू कमावल आहेस आणि आशा आहे की ही अनेक गोष्टींची सुरुवात आहे. जसे आपण ड्रेसिंग रूममध्ये म्हणतो, ते दुप्पट कर.” तसेच द्रविडने त्याला विशेष कॅप दिल्यावर कोहली म्हणाला “मी बीसीसीआयचे (BCCI) आभार मानू इच्छितो आणि माझ्या बालपणातील एका हिरोकडून मला १०० वी कसोटी कॅप मिळणे खरोखरच आश्चर्यकारक आहे,”

यावेळी विराटने मैदानावर उपस्थित त्याच्या परिवार आणि चाहत्यांचे देखील आभार मानले. तो म्हणाला “माझ्यासाठी हा एक खास क्षण आहे. माझी पत्नी आणि माझा भाऊ इथे आहे. प्रत्येकाला खूप अभिमान वाटत आहे. हा खरोखरच सांघिक खेळ आहे आणि तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हते. जितक्या संख्येत आम्ही तीन फॉरमॅटमध्ये खेळतो आणि आयपीएल मध्येही, पुढची पिढी माझ्याकडून एक गोष्ट घेऊ शकते, ती म्हणजे मी सर्वात शुद्ध स्वरूपात (कसोटी मध्ये) १०० सामने खेळलो.” २०११ मध्ये सबिना पार्क येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी पदार्पणात विस्मरणीय ४ आणि १५ धावा केल्यापासून, कोहलीने दशकभराच्या प्रवासात खूप लांबचा पल्ला गाठला आहे. ज्यामध्ये त्याने या प्रदीर्घ कालावधीत ५०.४९ च्या उत्कृष्ट सरासरीने ७९६२ धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!