Share

द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; या खेळाडूची संघात वापसी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात तडाखेबंद खेळाडू हार्दिक पंड्याची सांगत वापसी झाली आहे. तसेच विराट कोहलीच टीम इंडियाचे नेतृत्व करणार असून जसप्रीत बुमराहला पुन्हा एकदा विश्तंती देण्यात आली आहे.

टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे यांच्यावर फलंदाजीची धुरा असणार आहे. तसेच हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर हे अष्टपैलू खेळाडू संघात आहे. त्याचबरोबर राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर आणि नवदीप सैनी यांच्यावर गोलंदाजीची धुरा आहे. तर रिषभ पंत यष्टीरक्षक असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका आणि त्यानंतर ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला ट्वेन्टी-20 सामना १५ सप्टेंबरला धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. यात दुसरा सामना १८ तारखेला मोहालीत खेळवला जाईल तसेच तिसरा सामना बंगळुरूमध्ये २२ तारखेला खेळवला जाणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!