टीम महाराष्ट्र देशा : लष्करी हवाई दल मजबूत करण्यासाठी भारताने फ्रान्सकडून राफेल हे लढाऊ विमान खरेदी केले आहे. हे विमान आता लवकरच भारताच्या लष्करातही दाखल होणार आहे. तर आता फ्रान्स भारताबरोबर आणखी एक नवीन करार करू इच्छित आहे. भारताला आणखी ३६ राफेल फायटर विमान विकत देण्याचा निर्णय फ्रान्सने घेतला आहे. तसेच हेलिकॉप्टर्स, पाणबुडयांचीही विक्री फ्रान्स करणार आहे.
या संदर्भात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युअल बोन आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेणार आहेत. नुकत्याच परीस येथे झालेल्या G – 7 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये एनएसए स्तरावरची उच्चस्तरीय बैठक होत आहे.
दरम्यान पुढच्या महिन्यात बहुचर्चेत असलेले राफेल लढाऊ विमान भारतात दाखल होणार आहे. राफेल विमान हे भारतातील सर्वात गाजलेले प्रकरण आहे. राफेल विमान खरेदीवरून सत्तधारी भाजपला विरोधकांनी चांगलेचं धारेवर धरले होते. तर या व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या व्यवहाराची सर्वोच्च न्यायालयात अजूनही चौकशी सुरु आहे. मात्र याचं राफेल व्यवहाराबाबत कॅग रिपोर्टमध्ये भ्रष्टाचार झाला नसल्याचं नमूद केले आहे.
- ‘उद्धव ठाकरेंची भेट घेतलेल्या भास्कर जाधवांनी मागितले राष्ट्रवादीकडे मुलासाठी तिकीट’
- ‘जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा; इतरांनी त्यात नाक खुपसू नये’
- UY कंपनीचा परवाना रद्द करुन उच्चस्तरीय चौकशी करा – नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

