नवी दिल्ली – अरबी समुद्रात गस्त घालत असताना भारतीय नौदलाच्या सुवर्णा या जहाजाने एका मच्छिमार नौकेवर केलेल्या कारवाईत 300 किलोग्रॅमहून अधिक अमली पदार्थ जप्त केले. या नौकेच्या संशयास्पद वावरामुळे सुवर्णा या जहाजावरील नौदलाच्या चमूने या नौकेवर उतरून तपासणी केल्यावर त्यावर हे अंमली पदार्थ सापडले.
ती बोट आणि त्यातील कर्मचाऱ्यांना पकडून भारतातील कोची या केरळमधील जवळच्या बंदरावर पुढील तपासणी करण्यासाठी नेण्यात आले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत सुमारे 3000 कोटी रुपये आहे. ही कारवाई केवळ जप्त केलेल्या सामग्रीचे आकारमान आणि मूल्याच्या दृष्टीकोनातूनच महत्त्वाची नसून, या कारवाईमुळे माक्रन किनारपट्टीवरून भारत, मालदीव आणि श्रीलंका या ठिकाणी पाठवण्यासाठी केल्या जाणाऱ्या अवैध तस्करीच्या मार्गांचा वापरही बंद करता येणार आहे.
व्यसनाधीनतेमुळे मानवी जीवनाची हानी होण्याबरोबरच, अंमली पदार्थांच्या तस्करांच्या जाळ्याच्या माध्यमातून दहशतवाद, कट्टरवाद आणि संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेल्या संघटनांना अर्थसाहाय्य पुरवले जात असते.
महत्त्वाच्या बातम्या
- योगी सरकारला ‘सर्वोच्च’ दिलासा, हायकोर्टाच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती
- कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांना क्वॉरन्टाइन करा, एमआयएमची मागणी
- ‘महाविकास आघाडी नव्हे, हे तर महाकन्फ्यूज सरकार’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
- ‘कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी जराही खपवून घेतली जाणार नाही’
- ‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

