Share

Russia-Ukraine war: युक्रेनमधून परत आलेल्या विद्यार्थ्यांबाबतीत भारत सरकारचा महत्वाचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सध्या युक्रेन आणि रशिया या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO मध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. रशियाचे लष्कर युक्रेनच्या लष्करापेक्षा कित्येक पटीने ताकदवान आहे. युक्रेनचे लष्कर रशियाच्या लष्कराएवढे ताकदवान नसले तरी ते रशियन लष्कराचा वीरतेने मुकाबला करत आहे. वोलोदेमीर झेलेन्स्की हे युक्रेनकडून एकटे खिंड लढवत आहेत.

या युद्धामुळे जगातील अनेक देशांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागत आहे. भारत पण याला अपवाद नाही. भारतातून दर वर्षी अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घ्यायला युक्रेनमध्ये जात असतात. मात्र सध्या चालू असलेल्या युद्धामुळे भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा हा उपक्रम हाती घेतला आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत अनेक भारतीय विद्यार्थी भारतात आले आहेत. युक्रेनमध्ये चालू असलेल्या युद्धामुळे भारतीय विद्यार्थ्यांना आपले वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून यावे लागले आहे. आता याच मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकाराने महत्वाचा निर्णय घेतला आहे. नॅशनल मेडिकल कमिशनद्वारे नुकताच एक आदेश जरी करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसन्सिंग (FMGL) अॅक्टमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार, ऑपरेशन गंगा अंतर्गत विदेशातून आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात इंटर्नशिप पूर्ण करता येणार आहे. आत्तापर्यंत फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसन्सिंग नुसार ज्या विद्यार्थ्यांनी परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतले आहे , त्यांनी वैद्यकीय ट्रेनिंग आणि इंटर्नशिप भारताबाहेरच करणे हे बंधनकारक होते. मात्र भारत सरकारने  फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसन्सिंगमध्ये बदल केल्यास आता परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात सुद्धा आपला राहिलेला कोर्स पूर्ण करता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!