Share

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये गोळीबारीत जखमी झालेल्या हरजोत सिंगबाबत भारत सरकारचा महत्वाचा निर्णय

Published On: 

नवी दिल्ली : युरोप खंडात युक्रेन आणि रशिया या दोन देशात सध्या युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO या लष्करी आघाडीमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. या युद्धामुळे जगातील अनेक  देशांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष  रित्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागत आहे. भारत सुद्धा याला अपवाद नाहीये.

भारतातून दर वर्षी अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घ्यायला युक्रेनमध्ये जात असतात.  युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना  मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ हा उपक्रम सुरु केला आहे. ऑपरेशन गंगा  अंतर्गत आत्तापर्यंत युक्रेनमधून १७ हजार पेक्षा जास्त युक्रेनमध्ये अडकलेले नागरिक भारतात परतले आहेत. तर काही भारतीय नागरिक अजूनही युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी झगडत आहेत. त्यातच आज एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हरजोत सिंग हा तरुण युक्रेनमधून बाहेर पडत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. २७ फेब्रुवारीला युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्हमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असेलेल्या हरजोत सिंग  नावाच्या भारतीय विद्यार्थ्यावर गोळी झाडण्यात आली, यामध्ये तो जखमी झाला आहे.

सध्या हरजोत कीव्ह येथील रुग्णालयात दाखल आहे. आता याच गोळीबारीत जखमी झालेल्या हरजोत सिंगच्या उपचाराचा सगळा खर्च भारत सरकार उचलणार आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या बाबत माहिती दिली. तसेच लवकरात लवकर हरजोत सिंगला भारतात परत आणण्यात येणार आहे अशीही ग्वाही आज पत्रकार परिषदेत अरिंदम बागची यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!