Share

“२०२४ साली आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारचं”, आदित्य ठाकरेंचा दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. मुंबईचे महत्व कमी करुन सगळं काही दिल्लीला नेण्याचा डाव सुरु आहे. मात्र २०२४ साली आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारचं असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान इतर पक्ष नाटकं करतात पण आपण परखडपणे बोलतो. मराठीचे काय होणार याची आजच्या दिवशी चिंता करत बसण्यापेक्षा आजचा दिवस साजरा करुया. मराठी भाषा दिल्लीच्या तख्तापुढे कधीही झुकली नाही आणि आजही ही मराठी दिल्लीपुढे झुकणार नाही असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी सुभाष देसाईंनी आम्हाला शासकीय मराठी भाषा सक्तीची केली आहे. ती समजायला जरा अवघड आहे. जीआर वाचायला घेतला तर समजत नाही. देसाई सरांना विनंती आहे की ती थोडी सोपी करुन द्यावी असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच मरिन ड्राईव्हला आपण मराठी भाषा मंडळाची इमारत उभारत असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. तसेच
गिरगांव चौपाटीच्या बाजुला मराठी आणि संस्कृतीचे कलादालनही सुरु होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!