नवी दिल्ली : 1983 च्या विश्वचषकातील विजयावर आधारित “83” हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या हा चित्रपट खूप पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाचे सर्वजण खूप कौतुक करत आहेत. त्याचवेळी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) “83” चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कॅप्टन कोहलीही या चित्रपटाने खूप प्रभावित झाला आहे.
कपिल देव 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार होते आणि त्यांची भूमिका या चित्रपटात रणवीर सिंगने साकारली आहे. 25 जून रोजी लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या ऐतिहासिक अंतिम सामन्यापर्यंत या चित्रपटाची कथा आहे, जिथे भारताने दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजचा 43 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. कपिल देव यांनी 38 वर्षांपूर्वी कठीण परिस्थितीत संघाला चॅम्पियन कसे बनवले. ही एक अशी कथा आहे, जी हजारो-लाखो वेळा सांगितली गेली आहे पण लोकांना ती पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळत आहे.
1983 च्या विश्वचषकातील विजयावर बनलेल्या या चित्रपटाने विराट कोहली खूप प्रभावित झाला आहे. त्याने ट्विट केले की, “भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील त्या प्रतिष्ठित क्षणाला मी इतक्या चांगल्या प्रकारे जगू शकलो नसतो. हा एक उत्तम चित्रपट आहे जो तुम्हाला 1983 च्या विश्वचषकाच्या भावनांमध्ये घेऊन जाईल. सर्व पात्रांनी उत्तम काम केले आहे.”
@RanveerOfficial was a different level altogether. Great job everyone! @therealkapildev @kabirkhankk ????
— Virat Kohli (@imVkohli) December 25, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांच्या ‘अतरंगी’ फोटोनंतर नितेश राणेंनी शेअर केला ‘हा’ फोटो; म्हणाले,‘ओळखा पाहू कोण?’
- ‘रात्रीस खेळ चाले’चा हा प्रयोग प्रभावी ठरणारा असला तरी…- संजय राऊत
- नियमांचे पालन सगळ्यात आधी पंतप्रधानांनी करायला हवे – संजय राऊत
- चिंताजनक! देशातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ४१५ वर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
- ‘हा सण सर्वांच्या जीवनात आनंद,समाधान,समृद्धी,उत्तम आरोग्य,प्रेम आणि अहिंसा घेऊन येवो’


