🕒 1 min read
अहमदाबाद : भारताने कसोटी मालिका ३-१ ने आपल्या खिशात घातली होती. आता, भारत आणि इंग्लंड मध्ये टी-२० मालिकेला सुरुवात झाली आहे. आज पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या टी 20 मालिकेतील सर्व म्हणजेच 5 सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरात क्रिकेट असोसिएशनने स्टेडियममध्ये फक्त 50 टक्के क्रिकेट चाहत्यांनाच परवानगी दिली आहे.
दरम्यान, भारताची सुरुवात ही अडखळत झाल्याचं दिसून येत आहे. सलामीवीर के एल राहुल अवघी एक धाव करून माघारी परतला. तर, कर्णधार विराट कोहली शून्य धावांवर बाद झाला. यानंतर शिखर धवन देखील ४ धावांवर बाद झाला. तर, भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिषभ पंत देखील २१ धावांवर माघारी परतला.
यानंतर, हार्दिक पांड्या व श्रेयस अय्यरच्या जोडीने भक्कम स्थिती निर्माण करण्यासाठी फटकेबाजी केली. मात्र, हार्दिक पांड्या २१ चेंडूंमध्ये १९ धावा करून झेलबाद झाला. यानंतर, दुसऱ्याच बॉलवर शार्दूल ठाकूर देखील झेलबाद झाला. श्रेयस अय्यर देखील अखेरच्या षटकात झेलबाद झाला. भारताकडून श्रेयस अय्यरने ४८ चेंडूंमध्ये ६७ धावा करत भारताला १२४ धावांची मजल गाठून दिली. दरम्यान, इंग्लंडला विजयासाठी अवघ्या १२५ धावांची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हे नेमकं अतिरेकी प्रकरण आहे की खंडणीचा विषय ? हे बाहेर यायला हवं’
- रोहित शर्माचा पहिल्या टी-२० संघात समावेश नसल्याने संताप; मुंबई इंडियन्सने केलं ‘हे’ ट्विट
- धक्कादायक! लातूरच्या वसतिगृहात तब्बल ८७ विद्यार्थी कोरोनाबाधित
- कारवाईचा अतिरेक नको; राज्याच्या मुख्य सचिवांनी दिल्या महत्वाच्या सूचना
- ‘रायवाडीत छत्रपती शिवरायांचा पुतळा पूर्ववत बसवावा, अन्यथा आत्मदहन’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
