🕒 1 min read
मुंबई: नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष अशोक गावडे (Ashok Gawade) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेत याला विरोध केला आहे. तर आता भाजपच्या चित्रा वाघ (Demand of BJP leader Chitra Wagh) यांनी थेट अशोक गावडेची जीभ छाटा अशी मागणी केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, अशोक गावडे ची जीभ छाटा. राष्ट्रवादीचा नवी मुंबईचा हा हरामखोर जिल्हाध्यक्ष कुठल्या मस्तीत आहे? अमृता फडणवीस यांचा ज्या निचमनोवृत्तीने उल्लेख याने केला हे राष्ट्रवादीला मान्य आहे का? आणि यात कुणालाही महिलांचा अपमान विनयभंग दिसत नाही? असा सवाल करत मुंबई पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Russia-Ukraine War: रशिया -भारत संबंधांबाबतीत अमेरिकेचे मोठे विधान
‘पुढच्या अधिवेशनात आम्ही मराठा अक्षणाचा…’; प्रविण दरेकरांचे आंदोलनकर्त्यांना आश्वासन
युक्रेनच्या महिला खासदाराने उचलले शस्त्र! म्हणाल्या, “मला कधीच वाटलं नव्हतं की…”


