🕒 1 min read
नवी दिल्ली: सध्या हिजाब प्रश्नामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कर्नाटकात काही दिवसांपूर्वी मुस्लिम विद्यार्थिनींना शाळेत आणि महाविद्यालयात हिजाब घालून येण्यावर बंदी घातली होती. त्याविरोधात न्यायालयात विद्यार्थिनींनी दाद मागितली आहे. तत्पूर्वी एका मुस्लीम मुलीला कॉलेजमध्ये येण्यास रोखून ‘जय श्री राम’चे नारे देण्यात आले. याचा व्हिडिओहि सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटत असतानाच आता आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील हा विषय पोहचला आहे.
दरम्यान या सर्व प्रकरणावर आता समाजसेविका नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईने (Nobel laureate Malala Yousafzai) प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्वीट करत म्हटले आहे कि, “कॉलेज आम्हाला अभ्यास आणि हिजाब यापैकी एक निवडण्यास भाग पाडत आहे. मुलींना हिजाब घालून शाळेत जाऊ देण्यास नकार देणे अतिशय भयानक आहे. कमी किंवा जास्त वस्त्र परिधान केल्यामुळे स्त्रियांची वस्तुस्थिती कायम आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लीम महिलांचे दुर्लक्ष थांबवले पाहिजे.”
“College is forcing us to choose between studies and the hijab”.
Refusing to let girls go to school in their hijabs is horrifying. Objectification of women persists — for wearing less or more. Indian leaders must stop the marginalisation of Muslim women. https://t.co/UGfuLWAR8I
— Malala Yousafzai (@Malala) February 8, 2022
दरम्यान यावर देशभरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत रोज नवं-नवीन व्हिडिओ समोर येत आहेत. दरम्यान कर्नाटकातील वाढत्या वादामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई(Basavraj Bommai) मोठा निर्णय घेतला असून राज्यातील पुढील तीन दिवसांसाठी सर्व शाळा आणि कॉलेज बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- आनंद महिंद्रा यांना सापडली ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची ‘भिंत’, फोटो शेअर करत म्हणाले…
- अपक्ष उमेदवाराची ‘मोदी रसोई’ ठरतेय चर्चेचा विषय
- “…त्यामुळे पेट्रोलची गरजच भासणार नाही”, नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य
- पुण्यातील कर्वे रस्त्यावर वाहतुकीचा प्रश्न मिटणार, काय आहे कारण …
- “..तिने कमजोरांना संदेश देत मिसाल सिद्ध केली”, कर्नाटकातील घटनेवर असदुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
