🕒 1 min read
मुंबई : कोरोना संसर्गामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर भारतीय संघ इंग्ंलंडमध्ये जागतीक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना खेळायला सज्ज आहे. बीसीसीआयने या सामन्यासाठी नुकताच संघ जाहिर केला. या सामन्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारताला इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.
मात्र यादरम्यान जुलै महिन्यात भारताचा कोणताही दौरा नाही. तेव्हा या काळात उर्वरीत आयपीएल स्पर्धा होण्याची शक्यता होती. मात्र बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने ते शक्य नसल्याचे सांगत या महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार असल्याचे सांगितले. श्रीलंकेच्या या दौऱ्यात भारतीय संघ ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळणार असल्याची माहिती गांगुलीने दिली आहे.
हा दौरा संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्याची मालिका खेळायला जाणार आहे. या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधिच झालेली आहे. जुन महिन्यात भारतीय संघाला जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान होणार आहे. यानंतर इंग्लंडमध्ये ४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामने खेळायचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांचे आवाहन म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, असला किळसवाणा प्रकार’
- आमचा वाली कोण? लातूरमधील इंटर्न डॉक्टरांचा प्रश्न; विविध मागण्यासांठी काम बंद आंदोलन
- आता ‘या’ राज्यातदेखील खासगी रुग्णालयांमध्येही होणार कोरोना रुग्णांवर मोफत उपचार
- नांदेडचा ऑक्सिजन टँकर पळवला; अशोक चव्हाणांचा गडकरींना फोन आणि मग…
- महाराष्ट्र सावरतोय : नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट तर ६० हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
