Share

‘भारत इतर देशांना लसीची निर्यात पुन्हा सुरू करणार’, मोदी सरकारची माहिती

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारत पुढील महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसींची परदेशात निर्यात सुरू करेल, अशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केली. ऑक्टोबर महिन्यापासून वैद्यकीय कंपन्यांकडून लसपुरवठा मोठ्या प्रमाणात होणार असल्याने आता निर्यातीवर भर देण्यात येणार आहे. मात्र, देशाची गरज पूर्ण झाल्यानंतरच अतिरिक्त लस निर्यात केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मांडविया म्हणाले, ‘भारत पुढील महिन्यात व्हॅक्सिन मैत्री कार्यक्रम व जागतिक कोव्हॅक्स पुढाकाराबाबत प्रतिबद्धता पूर्ण करेल. तथापि, देशातील लोकांच्या लसीकरणाला सरकारचे प्राधान्य आहे. नागरिकांसाठी लसींच्या डोसची संपूर्ण व्यवस्था झाल्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान निर्यात सुरू केली जाईल. देशात या महिन्यात २६ कोटी डोस व ऑक्टोबरमध्ये ३० कोटी डोस उपलब्ध होतील. पुढील ३ महिन्यांत एकूण १०० कोटींपेक्षा जास्त डोस मिळतील. त्यात कोविशील्ड, कोव्हॅक्सिनसह झायडस कॅडिला आणि बायोलॉजिकल ई-व्हॅक्सिनचा समावेश आहे.’

ते म्हणाले की, भारताची लसीकरण मोहीम जगासाठी आदर्शवत असून ती वेगाने पुढे जात आहे. पुढील तीन महिन्यांत १०० कोटींपेक्षा जास्त डोस उपलब्ध होतील. आतापर्यंत देशात ८१ कोटींपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत. या ८१ कोटींपैकी अखेरचे १० कोटी डोस देण्याला फक्त ११ दिवस लागले. एकंदर भारताने नागरिकांच्या लसीकरण मोहिमेत आघाडी घेतली आहे, असे मांडविया यांनी स्पष्ट केले. भारतीयांची गरज पूर्ण झाल्यानंतरच निर्यात मोहीम तीव्र केली जाणार असून त्यासाठी ‘डब्ल्यूएचओ’ आणि ‘कोव्हॅक्स’ची मदत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!