मुंबई: अमेरिकेच्या लौकिकाला बाधा पोहोचवणाऱ्या कालच्या घटनेस जबाबदार असलेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या बेजबाबदार व्यक्तीसाठी लाखो रुपये खर्च करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी जणू एक मोठी रॅली आयोजित केली होती.
निवडणुकीत उमेदवार असलेल्या दुसऱ्या राष्ट्राच्या अध्यक्षासाठी एखाद्या देशात अशी रॅली सहसा आयोजित करणे परराष्ट्र धोरणाला अनुसरुन होत नसते. अश्या ट्रम्प यांच्यासोबतच्या नरेंद्र मोदी यांच्या दोस्तीचे दुष्परिणाम भविष्यात भारताला भोगावे लागणार आहेत, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.
इंग्लडमध्ये नवा कोरोनाचा प्रकार पसरू लागला असतानासुद्धा इंग्लडच्याच पंतप्रधानांना प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते. आता तर तो दौराही रद्द करण्यात आल्यामुळे भारतावर नामुष्कीची वेळ आली आहे. याशिवाय भारताभोवतालच्या नेपाळ, श्रीलंका व भूतान या देशामधील राजकीय घटना व चीनचा या देशांवरील वाढत चाललेला प्रभाव या साऱ्यामुळे मोदींच्या परराष्ट्र धोरणातील अपरिपक्वता उघड झाली आहे, असेही गाडगीळ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- नगरची व्हीआरडीई चेन्नईला हलविण्याच्या हालचाली, निलेश लंकेंनी घेतली पवारांची भेट
- रोहितच्या नादात चाहत्याने काढली अर्धी मिशी; सोशल मीडियावर जोरदार चर्चा
- ‘टिवटिव’ कायमची बंद ! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटरची मोठी कारवाई…
- ‘बरे झाले, या दळभद्री ट्रम्पचे पाय आपल्या महाराष्ट्रात लागले नाही’; राऊतांचा मोदींवर घणाघात
- उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावल्यानंतर बाळासाहेब थोरात यांचं प्रत्युत्तर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

