Share

नगरची व्हीआरडीई चेन्नईला हलविण्याच्या हालचाली, निलेश लंकेंनी घेतली पवारांची भेट

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर:- देशासह महाराष्ट्र राज्यामध्ये नगरची खास ओळख असलेली वाहन संशोधन व विकास संस्था व्हीआरडीई चेन्नईला हलविण्याच्या हालचाली सुरू झाली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही संस्था येथून हलविण्यात येऊ नये, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी विरोध केला असून यामुळे १ हजार कामगार बेरोजगार होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची गुरुवारी भेट घेऊन हे केंद्र स्थलांतरित करु नये अशी लेखी मागणी केली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केली, तर एक मोठी केंद्रीय संस्था राज्याबाहेर जाण्याच्या धोका आहे.

व्हीआरडीई ही संस्था नगर-दौंड रस्त्यावर आहे. ही संस्था केंद्रीय संरक्षण विभागाच्या अंतर्गत येते. संस्थेच्या देशभरात 52 शाखा आहेत. त्यातील नगरची एक शाखा आहे. नगरच्या शाखेतील प्रयोगशाळेने आतापर्यंत अनेक उपयुक्त संशोधने केली आहेत. संरक्षण विभागासाठी आवश्यक असलेली वाहने आणि अन्य सामुग्री येथे विकसित झाली आहे.

दरम्यान, आता ही संस्था बंद करून ती चेन्नई किंवा अन्य ठिकाणच्या शाखेत वर्ग करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिकांमधून या स्थलांतराला विरोध होण्याची शक्यता आहे. आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधीचं सविस्तर एक निवेदन दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!