🕒 1 min read
मुंबई : देशातील राजकारणात सातत्याने वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्या. आज स्वतः एन. व्ही. रमणा यांनी याबत माहिती दिली आहे. “मी सक्रिय राजकारणात (Active Politics) सामील होण्यास उत्सुक होतो. पण नियतीने वेगळा निर्णय घेतला, म्हणून राजकारणात येणं राहून गेलं, अशी खंत रमणा यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
एका कार्यक्रमादरम्यान ते राजकारण आणि राजकीय पक्ष यावर बोलत होते. यावेळी त्यांनी “लोकशाहीत न्यायसंस्था ही स्वतंत्र संस्था असून संविधानाप्रति बांधिलकी राखणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे. मात्र, काही राजकीय पक्षांन वाटते की, न्यायालयाने त्यांची बाजू घ्यायला पाहिजे, त्यांच्या कृतीचे समर्थन केले पाहिजे. पण आमची जबाबदारी केवळ राज्यघटनेप्रति बांधिलकी राखणे आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही” अशा शब्दांत आपले मत व्यक्त केले.
यावेळी त्यांनी राजकारणात येण्याची इच्छा होती मात्र नियतीमुळे वेगळा निर्णय घ्यावा लागला अशी खंतही व्यक्त केली. “मी सक्रिय राजकारणात सामील होण्यास उत्सुक होतो. पण नियतीने वेगळा निर्णय घेतला, म्हणून राजकारणात येणं राहून गेलं”, असे रमणा यांनी म्हटले आहे.
"I was keen to join active politics. But destiny decided otherwise", Chief Justice of India NV Ramana says in a public lecture.#CJIRamana pic.twitter.com/DLjC9yF4Ww
— Live Law (@LiveLawIndia) July 23, 2022
रमणा यांची २ सप्टेंबर २०१३ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्यानंतर १७ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांची दिल्ली उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. सध्या ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहे. त्यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ambadas Danve : बंडखोरी केलेल्या पाच जणांपैकी एकही आमदार निवडून येणार नाही – अंबादास दानवे
- Deepika Padukone | रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर दीपिका पदुकोणने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…
- Phone Tapping Case | शिंदे-फडणवीस सरकारचा मविआला धक्का! रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण सीबीआयकडे
- Tirumala | “…तर गाडीतली शिवाजी महाराजांची मूर्ती काढा”; तिरुपती बालाजी परिसरातील खळबळजनक घटना । पहा VIDEO
- NCP on Deepak Kesarkar | दीपक केसरकरांनी इतरांवर टीका करताना स्वतःचे रक्त तपासावे ; राष्ट्रवादीची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
