पुणे : कोरोना महामारीमुळे सगळ्या जगाचे डोळे खाडकन उघडले आहेत. अशा महामारीचा सामना करण्यात भारत कधी नव्हे तो आज नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वामुळे स्वालंबी झाला आहे. आजवर कोणत्याही महामारीवर पाश्चात्य देशातून लसी मागवाव्या लागायच्या. आज कोरोनावर भारतातच लस निर्मीत झाली असून ती भारतातील मुख्य शहरांसह देशातील कानाकोप-यात जलद आणि प्रभावी पद्धतीने पोहचवली जात आहे. दूर्गम भागात ड्रोनच्या मदतीसह आदी तंत्रज्ञान आणि दळण-वळण साधनांचा उपयोग करुन घेऊन आपण लवकरच कोरोना लसीकरनाचा शंभर कोटींचा टप्पा लवकरच गाठू असा विश्वास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यक्त केला.
पुणे शहरात विविध 19 ठिकाणांसह बाणेर येथे 20 व्या सोनो क्लिनिक डायग्नोस्टिक सेंटरच्या लोकार्पण समारंभा प्रसंगी पवार बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर स्नेहल बडजाते, वैभव बेदरकर, सी.पी.एस.सी.चे अध्यक्ष गिरीश मैंदरकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, बी.एम.ए. चे अध्यक्ष राजेश देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या, अनेकदा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आपण आपल्या आरोग्याची हेळसांड करतो. जोवर शरीर काही तक्रार करीत नाही तोवर आपण आरोग्याबाबत दक्ष राहत नाही. पंरतू वेळोवेळी वयाच्या विविध टप्प्यांवर आरोग्याशी संबंधीत विविध चाचण्या करुन घेणे आवश्यक आहे. एखाद्या आजाराचे वेळीच निदान झाल्यास त्या आजाराचे व्याधीत रूपांतर होण्याआधी आपण त्यावर उपाय योजना करु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
- कमी प्रतिच्या गांजामुळेच विरोधकांची बेताल बडबड – संजय राऊत
- ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
- ‘केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर असल्यानेच चुकवलेले पैसे जमा करावे लागले’
- जातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…
- काँग्रेस-राष्ट्रवादीचं माझ्या माथी आलेले पाप मी निस्तरतोय : नितीन गडकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

