Share

काँग्रेस-राष्ट्रवादीचं माझ्या माथी आलेले पाप मी निस्तरतोय : नितीन गडकरी

Published On: 

🕒 1 min read

नागपूर – गेली ११ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या गोंधळाविरोधात मनसे रस्ते आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिले यांनी मागच्या काही महिन्यांत रान उठवले होते. आपल्या अभ्यासपुर्ण लाईव्हद्वारे त्यांनी कोकणवासियांना या विषयावर जागे केले होते. मुंबई-गोवा महामार्गाचे मुख्य अभियंता, सहाय्यक अभियंता यांच्याशी सातत्याने चर्चा करून, आंदोलने करून मनसेने या विषयावर प्रशासनालाही झोप लागु दिली नव्हती.

आज याच विषयावर मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण आणि रस्ते आस्थापना कार्याध्यक्ष योगेश चिले यांनी केंद्रीय मंत्री, रस्ते परिवहन व महामार्ग नितीन गडकरी यांची त्यांच्या नागपुरच्या घरी भेट घेतली.यावेळी गडकरी म्हणाले, त्या काँग्रेस-राष्ट्रवादीच पाप मी निस्तरतोय. पण माझ वैयक्तिक लक्ष आहे या रस्त्यावर. मी कोकणाला लवकरात लवकर चांगला रस्ता देणार.

माझा शब्द आहे हा आणि मी शब्द पाळतो. म्हणुनच कामाचा स्पिड वाढवण्यासाठी ज्यांच्यामुळे हा रस्ता रखडलाय त्या दोन काँट्रॅक्टरना मी बदलतोय.. काळजी करू नका … गडकरी साहेबांनी चेहर्यावरच स्मितहास्य कायम ठेऊन मनसेच्या शिष्टमंडळाला आश्वस्त केलं अशी माहिती चिले यांनी दिली आहे.

खरतर नितीन गडकरी यांची शुगर आज वाढलेली होती. त्यामुळे ते त्रासलेले होते पण राज ठाकरे यांनी पाठवल आहे हे कळल्यावर त्यांनी आवर्जुन चौकशी केली. विषय समजुन घेऊन साहेबांना सांगा हा विषय मी लवकरच संपवतोय असा निरोपही शिष्टमंडळाला दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!