Share

‘ग्लोबल हंगर इंडेक्सच्या यादीत भारताचा क्रमांक अगदी वर, मग ‘अच्छे दिन’ नेमके कोणाचे आले?’

Published On: 

मुंबई: भूक आणि कुपोषणाच्या नोंदी घेऊन जगभरातील विपन्नावस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’च्या ताज्या अहवालाने भुकेच्या बाबतीत भारतात असलेल्या विदारक स्थितीचे जळजळीत वास्तव समोर आणले आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.

2015 मध्ये म्हणजे सहा वर्षांपूर्वी भुकेच्या निर्देशांकात जगातील एकूण देशांच्या संख्येत हिंदुस्थान 93व्या स्थानावर होता. उपासमारीतील हे स्थान आता शंभरी ओलांडून 101 व्या क्रमांकावर पोहोचले आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सच्या यादीत समाविष्ट असलेल्या 117 देशांमध्ये हिंदुस्थानचा क्रमांक इतक्या वरचा लागला असेल तर ‘अच्छे दिन’ नेमके कोणाचे आले? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

गरिबी व उपासमारीच्या मुद्दय़ावर काम करणाऱ्या सेवाभावी संस्था दरवर्षी संयुक्तपणे जागतिक उपासमारीचा आढावा घेऊन गरिबी आणि दारिद्रय़ातून होणाऱ्या उपासमारीची भयंकर परिस्थिती जगभरातील राष्ट्रांसमोर मांडत असतात. या दोन संस्थांच्या अहवालामुळे भूक आणि उपासमारीच्या बाबतीत आपण कुठे आहोत, हे प्रत्येक देशाला कळते. या अहवालाची नोंद घेऊन कोणते देश उपासमार कमी करण्यासाठी काय प्रयत्न करतात, हा मुद्दा अलाहिदा असला तरी त्या त्या देशातील जनतेपर्यंत किमान अशा अहवालाच्या निमित्ताने वास्तविक चित्र तरी पोहोचते, हेदेखील कमी नाही. अन्यथा आपल्या राजवटीत सारं कसं आलबेल आहे, सगळीकडे कसा आनंदी आनंद पसरला आहे, याचेच गोडवे जो तो राष्ट्रप्रमुख आणि त्यांचे स्तुतीपाठक सदैव गात असतात.

भारतापुरते बोलायचे तर ग्लोबल हंगर इंडेक्सचा हा अहवाल आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. कारण भूक आणि उपासमारीच्या बाबतीत भारत नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तानच्याही मागच्या रांगेत जाऊन बसला आहे. असा इशाराही राऊत यांनी दिला आहे. भुकेने व्याकूळ असलेल्या आणि उपासमार सहन करणाऱ्या लोकसंख्येच्या देशात भारतासारखा प्राचीन खंडप्राय देश शंभरावरच्या स्थानावर पोहोचावा हे चित्र देशवासीयांची मान शरमेने खाली झुकवणारे आहे. ‘उपासमारीचा देश’ ही ओळख आता मिटवावीच लागेल. राज्यकर्ते आणि समाजव्यवस्थेला हातात हात घालून त्यासाठी काम करावे लागेल.असे आवाहन संजय राऊत यांनी सामनातून केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!