मुंबई: कोणी अंगावर आलं, तर शिंगावर घेऊ आणि मी हे आव्हान माझ्या शिवसैनिकांच्या जीवावर देतोय. पोलीस आणि प्रशासनाच्या जीवावर आव्हान देत नाही. तुम्हाला अंगावर यायचं असेल तर स्वत:च्या जीवावर आव्हानं द्या. सीबीआय, ईडीच्या जोरावर आव्हानं देऊ नका. आव्हानं द्यायचं आणि मग पोलिसांच्या मागे लपायचं याला हिंदुत्व म्हणत नाही. त्याला नामर्दपणा म्हणतात. अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून भाजपवर निशाना साधला आहे. आता यावरच भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.
दसरा भाषणानंतर आता पूर्ण आत्मविश्वासाने मी सांगू शकतो की, उद्धवजींमध्ये राहुलजी आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसत आहेत. यामध्ये आता कोणतीही शंका नाही. असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. त्यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला आहे.
दरम्यान कालच्या दसरा मेळाव्यात हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असून भाजपमधील उपटसुंभ नवहिंदूंमुळे देशात हिंदुत्वाला धोका असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. हिंदुत्वाचे तुमचे विचार तुमचीच माणसे ऐकणार नसतील तर काय उपयोग, असा सवालही त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना केला. तुम्ही म्हणता आपले सर्वाचे पूर्वज एक होते. मग उत्तर प्रदेशातील ज्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले त्यांचे पूर्वज परग्रहावरून आले होते काय, हे सर्व प्रकार तुम्हाला मान्य आहेत काय, असा संतप्त सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्यांच्या कारभारात केंद्राची लुडबुड नको’, मुख्यमंत्र्यांचे जाहीर आव्हान’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- प्रदीर्घ काळानंतर लवकरच’सकिनाची प्रेमकथा’;सनी देओलने केली घोषणा..!
- कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रोहित पवारांवर प्रशासन कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

