मुंबई : सलमान खान हा सध्या त्याच्या आगामी टायगर ३ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान नुकतंच खानने हिंदी सिनेसृष्टीच्या बदलत्या स्वरुपावर भाष्य केले आहे.
काही दिवसांपूर्वी सलमानने मुंबईत एका कार्यक्रमाला गेला होता. यावेळी सलमान खानला सिनेसृष्टीच्या बदलत्या स्वरुपाविषयी विविध प्रश्न विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना सलमान म्हणाला, “ज्यांना असं वाटतं की भारत देश हा फक्त कफ परेड आणि अंधेरीदरम्यान आहे, त्यांनी खरा भारत समजून घेणे गरजेचे आहे. जोपर्यंत या लोकांना खरा भारत समजत नाही, तोपर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये खरा भारत देश कसा दिसेल?”
कफ परेड हे दक्षिण मुंबईतील एक सुसज्ज असे ठिकाण आहे. तर अंधेरी हे आजकाल हिंदी चित्रपट निर्मितीचे मुख्य केंद्र बनले आहे”, असेही सलमान म्हणाला. दरम्यान सलमानने केलेले हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे.
यावेळी सलमान असेही म्हणाला मला दाक्षिणात्य चित्रपट आवडतात. पण अद्याप मला कोणत्याही चित्रपटाची ऑफर आलेली नाही. अनेकदा जेव्हा निर्माते, दिग्दर्शक माझ्याकडे येतात तेव्हा ते हिंदी चित्रपटांची ऑफर घेऊन येतात. तामिळ किंवा तेलुगू भाषिक चित्रपटांच्या ऑफर माझ्याकडे येत नाही, असे सलमानने स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या :


