Share

IPL 2022: आज धोनीच्या अनुभवी CSKला के एलचा नवोदित LSG संघ भिडणार; जाणून घ्या कोणाचे पारडे आहे जड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: क्रिकेटचा महाकुंभ IPL 2022 ला जोरदार सुरुवात झाली आहे. आयपीएलचा ७ वा सामना ३१ मार्च रोजी नवीन आयपीएल संघ लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जाईल. या दोन्ही संघानी त्यांचा पहिला सामना गमावला आहे. ज्यामुळे आज दोघेही पहिला विजय नोंदवण्यासाठी मैदानावर उतरताना दिसणार आहे.

पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जमध्ये (CSK) धोनीनंतर (MS Dhoni) पहिल्यांदाच रवींद्र जडेजा (ravindra jadeja) आयपीएलच्या १५ व्या मोसमात केकेआरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कर्णधारपदी आला होता. जिथे त्याला पराभवाचा सामना करावा लागला. सीएसकेच्या या पराभवानंतर जडेजाला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले की धोनीला पुन्हा संघाचा कर्णधार बनवावे. अशा स्थितीत रवींद्र जडेजा लखनऊ (LSG) विरुद्धचा सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

तर केएल राहुलच्या (KL Rahul) ताब्यात असलेला लखनऊ सुपर जायंट्सचा नवा आयपीएल संघ गुजरातविरुद्धचा लीगचा पहिला सामनाही हरला आहे. यानंतर कर्णधार म्हणून के एल पुन्हा टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. पंजाब प्रमाणे त्याला इथेही विजय मिळवण्यात यश मिळत नाहीये. आज केएल राहुलचा नवखा संघ आयपीएलमधील सर्वात अनुभवी संघ चेन्नईशी मुकाबला करेल. अशा स्थितीत लखनऊ आणि चेन्नई यांच्यात जोरदार स्पर्धा होऊ शकते.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!